५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत
कोपरगांव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल कोकमठाणचे १२१ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले असून आत्मा मालिक राज्यात प्रथम स्थानी आहे. यामध्ये इयत्ता ८ वी चे ११३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून राज्यात १०० पेक्षा जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येणारी आजपर्यंतची एकमेव शाळा ठरली आहे. इयत्ता ५ वी चे ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहे.
पाच विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले असून यामध्ये श्रेयश नलावडे २७४ गुणांसह राज्यात ११ वा तर जिल्हयात प्रथम, श्रेयश भवर २७२ गुणांसह राज्यात १३ वा तर जिल्हयात द्वितीय, धनश्री रक्ताटे २७२ गुणांसह राज्यात १३ वा तर जिल्हयात तृतिय, श्रीतेज इंगोले २६८ गुणांसह राज्यात १६ वा तर जिल्हयात चतुर्थ, सिध्दार्थ पगारे २६८ गुणांसह राज्यात १६ वा तर जिल्हयात पाचव्या स्थानी आहे.
अहिल्यानगर जिल्हयातून इयत्ता ८ वी, ग्रामिण मधून राज्यगुणवत्ता यादीत चमकलेले पाचही विद्यार्थी आत्मा मालिकचे आहे. आजपर्यंत ६८८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवा विक्रम गुरुकुलाने साकारला आहे. अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन, सुट्टीमधील तयारी शिबीरे, जादा वर्ग, स्मार्ट संडे, सुपर नाईट, सुवर्ण पहाट अभ्यासिका, सराव परिक्षा, तज्ञांचे मार्गदर्शन यांची ही फलश्रुती आहे असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले.
आत्मा मालिक शैक्षणिक संकुल हे विद्यार्थ्यांचे सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तीमत्व घडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याची प्रतिक्रीया अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी दिली. या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख अनिल सोनवणे, सचिन डांगे, सागर अहिरे, रविंद्र देठे, रमेश कालेकर, बाळकृष्ण दौंड, मिना नरवडे, पर्यवेक्षक नयना शेटे, गणेश रासने, सुनिल पाटील, नितीन अनाप यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, , कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्षे, मिरा पटेल आदींनी अभिनंदन केले.