नाशिक प्रतिनिधी :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांची सन २०२५- २०२६ या शैक्षणिक वर्षाच्या सुट्टी विषयी नियोजन सभा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेच्या प्रारंभी प्राचार्य प्रदिप सांगळे उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघ यांनी मुख्याध्यापक संघाच्या वतीने उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर व पी यु पिंगळकर विस्तार अधिकारी जि प नाशिक आणि मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी यांचे स्वागत केले.
या नियोजन सभेविषयी सुरवातीला पी .यु . पिंगळकर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.सावंत यांनी आपले शैक्षणिक विचार मांडले. त्यानंतर मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सन २०२५- २०२६ या शैक्षणिक वर्षाच्या सुट्टी नियोजनाबाबत उपशिक्षणाधिकी यांनी वर्षभरातील घ्यावयाच्या सार्वजनिक सुट्ट्या,आयुक्त यांच्या अधिकारातील सुट्ट्यां,शासनाच्या अधिकारातील व मुख्याध्यापक यांच्या अधिकारातील सुट्ट्यांची तरतूद याविषयी सविस्तर माहिती दिली.
या नियोजन सभेत मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.सावंत सचिव एस बी देशमुख उपाध्यक्ष प्रदीप सांगळे , मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी डॉ.अनिल माळी ,रोहित गांगुर्डे परवेजा शेख ,शिक्षक संघटनेचे नेते मोहन चकोर भागीनाथ घोटेकर गोरख कुणगर , सुरेश घरटे आदींनी चर्चेत सहभाग घेत वार्षिक सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आले.या प्रसंगी शिक्षण विभागाचे अधिकारी व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांनी साधकबाधक चर्चा करून तसेच विचारविनिमय करून वार्षिक सुट्ट्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. पवित्र पोर्टल, मुख्याध्यापक मान्यता यावर चर्चा झाली प्राचार्य भागीनाथ घोटेकर सर यांनी सर्वांचे आभार मानून नियोजन सभेचे अध्यक्ष उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर यांच्या परवानगीने सभा विसर्जित करण्यात आली.