पुणे प्रतिनिधी : मातंग साहित्य परिषदेतर्फे प्रसिद्ध मराठी गझलगायक गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे यांनी ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण , मराठी गजलेचे आद्य संशोधक डॉक्टर अविनाश सांगोलकर,गझलकार प्रमोद खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच सत्कार केला. सत्काराप्रसंगी भीमराव पांचाळे म्हणाले “लतादीदींच्या नावाचा पुरस्कार मला मिळणं,हा मी सुरेश भटांचा आशीर्वाद समजतो.तसंच हा माझा व्यक्तिगत सन्मान असला,तरी तो मी समस्त मराठी गझलविश्वाचाही सन्मान असल्याचं समजतो”,अशा आशयाच्या भावना त्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.
पांचाळे हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सध्या पुणे दौऱ्यावर आलेले आहेत.पांचाळे ह्यांनी नुकतेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकरांच्या नावाचा संगित क्षेत्रांतील सर्वोच्च रु.दहा लाख रकमेचा मानाचा पुरस्कार अलीकडेच समारंभपूर्वक प्रदान केलेला आहे.म्हणून हा विशेष सत्कार मातंग साहित्य परिषदेतर्फे करण्यात आला.या प्रसंगी म.भा.चव्हाण, डॉ.सांगोलेकर यांनीही पांचाळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.