आदेश राम कोळी याचे क्रीडा स्पर्धेत सुयश.

0

उरण  दि २९(विठ्ठल ममताबादे ) : हरियाणा पंचकुला  येथे स्पेशल ऑलम्पिक भारत नॅशनल सायकलिंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व आदेश राम कोळी यांनी केले. आदेश राम कोळी हा हनुमान कोळीवाडा, उरण येथील रहिवाशी असून तो स्वामी ब्रम्हानंद सी बर्ड विशेष शाळेत शिकत आहे.त्याने या स्पर्धेत दोन किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल व तीन किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत  ब्रॉन्झ मेडल पटकाविले .

भारतातून एकूण ४०० खेळाडू तेथे आले हॊते. त्यातून आदेश कोळी यांनी या क्रीडा प्रकारात सुयश प्राप्त केले आहे. आदेश कोळी यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शाळेच्या ट्रस्टी शिरीष पुजारी  , शिक्षिका चारू शहा ,छाया टीचर,मधुर उपाध्याय, पल्लवी परदेशी, राकेश म्हात्रे, मानसी पांचाळ, प्रशांत कदम, गणेश जाधव यांनी आदेश कोळी यांचे कौतुक केले. तसेच आदेश कोळी याला गोपाळ म्हात्रे (क्रीडा शिक्षक ), दयानंद पावर (महाराष्ट्र राज्य कोच )यांनी मार्गदर्शन केले.त्यामुळे मार्गदर्शक यांचेही यावेळी कौतुक व्यक्त करत आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here