तिकीट हट्टासाठी
मोठ मोठ्या रांगा
मीचं उभा राहीन
करती सारे कांगा….
निगेटिव्ह बा सर्वे
कारण साधे सांगा
पक्षश्रेष्ठी आठमूठ
कोण घेणारं पंगा…
शांत होईल हळूचं
होत राहणार दंगा
कमकुवत रेआम्ही
वेशीवर अब्रू टांगा…
दिल्लीवारी करता
दुखू लागली टांगा
कुणी देतो धमक्या
दाखवी आता इंगा…
स्नान केले भक्तीने
निघाली गटार गंगा
कारण सर्वेचे सांगून
तेल चोपडता अंगा….
नाराज होती राजी
फसती भक्त सोंगा
बाकी सापडे चक्रा
भुले वरलिया ढोंगा…
सोडून आले घरोबा
सौदा पडला मेहेंगा
आतले शरीर वेगळे
वरती वेगळा लेहंगा..
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996