साजरा गुढी पाडवा
जाणूनखरी संस्कृती
विक्रम संवत निर्मी
भास्कराचार्य गणिती….
वनवास सरे रामाचा
निघाले अयोध्दे प्रति
राज्याभिषेक सोहळा
सुशोभित सार्थनृपती….
क्रुरकौरव गेले लयास
सुखे नांदे द्रौपदी पति
सिंहासनावर धर्मराज
पांडव राज्य अधिपती….
संत झुलेलाल प्रकटे
त्या सिंधसमाज प्रांती
महर्षी दयानंद करती
आर्य समाज निर्मीती…
शिख द्वितीय गुरूवर्य
अंगद देवजी ये जगती
ब्रह्म पुराणातील नोंदी
झाली विश्वाची उत्पत्ती….
वसंतऋतु होई आरंभ
पल्लवी नव्याने धारती
रात्र लहान दिस मोठा
नव प्रारंभ करे धरती…
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996