देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
येथील श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज याञा उत्सवात या वर्षी उष्णतेचा पारा वाढल्यामुळे अनेक कुटुंबांनी याञेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे याञा उत्सवातील उलाढालीवर त्या परिणाम झाला आहे. कुस्ती हगामात अनेक मल्लांनी सहभाग नोंदविला या वर्षाची समर्थ बाबुराव पाटील चांदीची गदासह पंधरा हजाराच्या बक्षिसासह सलग सहाव्यांदा नगर येथिल अक्षय पवार याने प्रथम क्रमांक पटकविला. कोपरगाव येथिल कौस्तुभ अंबेकर यास चितपट करुन निर्णायक कुस्ती करण्यात आली.यावर्षीच्या याञेच्या पहिल्या दिवशी पोलिस प्रशासनाने डोळेझाक केल्याने चोरट्यांनी व्यापाऱ्यासह भाविकांना चांगलाच झटका दिला आहे.
श्रीसमर्थ बाबुराव पाटील महाराज याञा उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दीने उच्चांक मोडला जात होता. परंतू या वर्षी माञ उष्णतेचा पारा वाढल्यामुळे याञेत सहभागी होणाऱ्या भाविका रोडवली होती.यावर्षी खेळणी व इतर साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या दुप्पट दिसुन आल्याने अनेक दुकानदारांना दुकान लावण्यास जागा मिळाली नाही. अनेक दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला दुकाने लावल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होता.
याञा उत्सवाची सुरवात शिवव्याख्याते ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या किर्तनाने झाली. सकाळी गंगाजलची मिरवणुक शहरातुन काढण्यात आली.सायंकाळी ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पादुका व पालखी पुजन करुन छबिना मिरवणूकीस पारंभ झाला.याञा उत्सवात सहभागी झालेल्या बँण्ड पथकाने देवळालीकरांची मने जिंकल्याने बँड पथकास मोठा प्रतिसाद मिळाला.शोभेची आतिषबाजी मध्ये बेलापूर येथिल फिरोज शेख, वांबोरी येथिल परवेज शेख, संगमनेर येथिल बी एस फायर वर्क्सचे जैहुरभाई आदींनी आकर्षक आतिषबाजी केल्याने उपस्थित भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कुस्त्यांचा हंगामात अनेक मल्लांनी (पैलवान) यांनी सहभाग घेतला.कोपरगावचा कौस्तुम अंबेकर व अहमदनगरचा अक्षय पवार यांची निर्णायक कुस्ती झाली.या सामन्यात अक्षय पवार याने कौस्तुभ अंबेकर यास चिटपट करुन सलग सहाव्यांदा चांदीच्या गदेचा मानकरी ठरला आहे.पंधरा हजाराचे रोख बक्षिस हि त्याने पटकवले आहे.द्वितीय क्रमांक चांदीची गदा व सात हजाराचे रोख बक्षिस कोपरगाव येथिल कौस्तुभ अंबेकर यांनी पटकावला. तुमच्यासाठी कायपण या लावण्याचा बहारदार कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उपस्थित होती. लावण्याचा रसिकांनी आनंद लुटला.
याञा उत्सवाचे नियोजन डाँ.विश्वास पाटील,दत्ता कडू, गणेश भांड,सतिष वाळुंज,संजय पाटील, शुभम पाटील, कुणाल पाटील,अनिल पाटील, विनोद पाटील,डाँ.नामदेव कडू,दत्ता कडू, मुरलीधर कदम,संतोष चोळके, बाळासाहेब खुरुद,अशोक खुरुद,भाऊसाहेब गडाख, बाळासाहेब खांदे,संदिप कदम,बाबासाहेब मुसमाडे,कृष्णा मुसमाडे,सतिष होले,गजानन येवले,शिवाजी मुसमाडे,जेम्स पाळंदे,धनंजय शिंदे,अनिल ढुस,दिपक पठारे,महेश गडाख,संदिप कडू,रविंद्र मुसमाडे,सतिष राऊत,दत्ताञय गडाख आदी केले होते.
पोलिस चौकीत ……आणि चोरट्यांनी डाव साधला
श्री समर्थ बाबुराव पाटील याञा उत्सवाच्या पहिल्या दिवशी याञेकडे पोलिस प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले.अवघ्या तिन होमगार्डकडे याञेचा बंदोबस्त देण्यात आला. दोन होमगार्ड मंदिरात तर एक होमगार्ड याञेत गस्त घालत होता.पोलिस माञ चौकीत झोपले होते.राञीच्या वेळी छबिना व अतिष बाजीच्या ठिकाणी चोरट्यांनी डाव साधला. अतिष बाजीच्या ठिकाहुन चार मोटारसायकली चोरी गेल्या.रविंद्र तारडे यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.तर अन्य तीन जणांनी मोटारसायकल चोरी झाल्याबद्दल अर्ज दिला. या चोरीची गावभर चर्चा झाल्याने दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पोलिस उपनिरीक्षक समाधान पडोळ यांच्यासह पोलिस कर्मचारी तैनात झाले. पोलिस फौजफाटा याञेत दिसू लागल्याने चोरट्यांना डाव साधता आला नाही.