मुलांनी साकारले रामायण !ईश्वराम्मा दिन सांस्कृतिक गुणदर्शनाला प्रतिसाद

0

    

  नगर – श्रीगणेश, श्रीकृष्ण गोपिंका, श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानांच्या वेशातील बालगोपाळांनी शिर्डी व सत्यसाई बाबांच्या भजनावर तल्लीन होवून सादर केलेले नृत्यविष्कार उपस्थितांची टाळ्यांची दाद घेऊन गेला निमित्त होते भगवान श्री सत्यसाई बाबांच्या मातोश्री ईश्वराम्मा यांचा 52 वा स्मृतिदिन.

     बालविकास विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कला-गुणांना प्रोत्साहन देणारा ‘ईश्वराम्मा दिन’ म्हणून जगात साजरा होतो, त्याप्रमाणे साईभक्त अशोक कुरापाटी यांच्या पुढाकाराने गेली 35 वर्षे संस्कारक्षम, प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरा झाला. मंगळागौर व कठपुतली नृत्यातून स्त्री शक्तीच्या जागरासह प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मापासून रावण वधापर्यंत रामायणातील प्रसंग नृत्य-नाटिकेद्वारे मुलांनी जिवंत करुन भक्तीमय वातावरण राममय केले. उपस्थित प्रेक्षक-पालकांनी जय श्रीराम, सियावर रामचंद्रजी की जय, संकटमोचक जय हनुमान चा एकच जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर सादर केलेल्या गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. पारंपारिक लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. टाळ्यांच्या कडकडाटात बालकांच्या कलागुणांना दाद देण्यात आली. आयोध्यातील रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभुमीवर या सादरीकरणाने रामायणाची अनुभूती दिली. नाद मधुरांच्या वेदमंत्र घोषात वेशभुषा केलेल्या विद्यार्थ्यांचे माऊली सभागृहात आगमन झाले.

     श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेदसार, वेदमंत्र पठण, गायत्री मंत्र व

महिशासुर स्त्रोत्र पठणाने शानदार प्रारंभ विविध देव-देवता, महापुरुशांची वेश परिधान केलेल्या बालकलाकारांचे हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात संयोजक अशोक कुरापाटी यांनी सत्यसाईबाबा व ईश्वराम्मांच्या मानवी सेवा कार्याची, आध्यात्मिक अनुभुतीची माहिती दिली.

     कार्यक्रमात विविध देव-देवता, महापुरुषांच्या व्यक्तीरेखा बालकांनी सादर करुन आध्यात्मिक-सामाजिक-शैक्षणिक संदेश दिले. प्रगत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा होत असलेला सदुपयोग व दुरुपयोग विषयी विडंबनात्मक उहापोह करुन सर्वांचीच चांगली कान उघाडणी केली. साईबाबांच्या जीवन कार्य संदेशावरील नाटिका सादरीकरण सर्वांच्या मनावर  बिंबवून त्यांना अंर्तमुख केले. आरती विभुती प्रसाद वाटपाने या भक्तीमय शानदार कार्यक्रमांची सांगता झाली.

     सांस्कृतिक कार्यक्रमांचे रचनाकार सौ.विद्या दगडे, वैशाली वरुडे, सुरेखा डावरे, सुप्रिया ओगले-जोशी, वर्षा पंडित, वैष्णवी कुलकर्णी, मानसी देठे, प्राजक्ता लोखंडे आदिंचा शालाबाह्य संस्कारक्षम उपक्रमांसाठी धडपडणारे पालक प्रा.वृषाली मांडे, मंजुषा देशमुख, अनिता सिद्दम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. व प्रमुख अतिथींचा सत्कार साई समितीचे मार्गदर्शक प्रा.आर.जी.कुलकर्णी, प्रा.सौ.ज्योती कुलकर्णी, श्रीकृष्ण धर्माधिकारी, जिल्हाप्रमुख नंदलाल भालेराव, निमंत्रक अमोल सप्तर्षी, ज्येष्ठ साईभक्त नरसिंग दुसा, सौ.शोभा दुसा यांनी केला. एकपात्री कलाकार प्रा.विजय साबळे यांनी सूत्रसंचालन केले.

    

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here