विवाद विषय गाजे
निवडणूकीचे रोखे
सगळे होई शिकार
बंदूक सर्वावर रोखे….
कसे अडकवू कुणां
विचीत्र चालले डोके
हवालदार चूप कसे
दिवसा मारले डाके….
नियम अटी मार्गाने
कसे जमवले खोके
तोंडावर पडले तरी
सरळ राहिली नाके…
आकडे मोठे पाहून
चुके काळजा ठोके
जमवी देणग्या सारे
एक दुस-यांना ठोके….
रूळावरून नियमात
धडा धडा पळे चाके
सिग्नल दिसले नाही
इथेचं ड्रायव्हर चुके…
लक्ष असे आयोगाचे
कोण कधी तो चुके
कायद्याच्या चौकटी
बलाढ्य उंचही झुके…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.