सन्मान मार्ग सापडे
निवडणूकीचे रोखे
उघड अंधूक नजरा
डोळ्या जागी भोके…
काळा पैसा रे पांढरा
मारता पास शिक्के
रे देणारे घेणारे राजी
हिशोब सगळे पक्के…
उघड होतीलं पेट्या
असेचं बसती धक्के
जपून टाकतात पत्ते
खेळाडू भलते पक्के…
तपासून घ्यावे आधे
कुणास किती टक्के
कोण धुतले तांदूळ
सब घोडे बारा टक्के…
गडगंज होती सगळे
असू दे कुणी लुख्खे
रात्रीत श्रीमंत होण्यां
येणार सारखे मोके…
भयभीत होऊन पाहे
सर्वत्र संशयित धुके
मिळाली कुठे देणगी
पोटातकुणाच्या दुखे….
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.