सातारा/अनिल वीर : येथील कराडे ब्राह्मण संघ या संस्थेने नुकतेच वासंतिक हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते.
उपाध्यक्ष बाळासाहेब भाटे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सदरच्या कार्यक्रमात सौ.उज्वला नानल व सौ उज्वला गोडबोले यांच्या सुश्राव्य गायनाचा आनंद उपस्थितांनी घेतला. सौ उज्वला नानल यांनी संत ज्ञानेश्वरांच्या अवघाची संसार या अभंगाने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी अनेक भावगीते व जुन्या नाटकातील पदे सादर करून उपस्थितांना आनंद दिला.
विशेषतः ययाती आणि देवयानी या नाटकामधील येती मन मानित या या पदाने श्रोत्यांना जुन्या काळात नेऊन सोडले.सौ.उज्वला गोडबोले यांनी माणिक वर्मा यांचे सुप्रसिद्ध गीत घननिळा लडिवाळा तसेच त्या चित्त चोरट्याला ही गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सौ.नानल यांनी कार्यक्रमाची सांगता उघड्या पुन्हा जहाल्या या प्रसिद्ध भैरवीने केली. कार्यक्रमाला तबल्यावर सचिन राजोपध्ये आणि जयदीप ताटके आणि संवादिनीवर कुमारी स्वरा किरपेकर यांनी उत्कृष्ट साथ दिली. सूत्रसंचालन सौ. उत्तरापराडकर यांनी ओघवत्या भाषेत केले.त्यानंतर हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विजयालक्ष्मी फणसळकर यांनी केले.याकामी, सौ प्राची शहाणे,सौ. अजया करंबेळकर, सौ. शुभदा शेंबेकर , सौ.शैलजा काटदरे आणि अन्य महिलांनी परिश्रम घेतले.यावेळी समाजातील सर्व महिला सहभागी झाल्या होत्या.