कोपरगाव : कोपरगाव बस स्थानकातील बसचे वेळापत्रकाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागत आहे. या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण—? असा सवाल भाजपा चे चेतन खुबाणी यांनी प्रशासनाला केला आहे.
सततच्या सुट्या- व वेळोवेळी खराब असणाऱ्या बसेस यामुळे कोपरगाव आगरातून सुटणाऱ्या बसेस चे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले दिसते.
कोपरगाव आगरातून दररोज संपुर्ण महाराष्ट्रात बसेस जात असतात पैकी कोपरगाव- नासिक अशा एकुण 12 बसेस आगरातून निघतात परंतु गेली अनेक महिन्यापासून सदर बसेस कधीच वेळेवर निघत नसल्याचे चित्र बस स्टँडवर बघावयास मिळते.
मुळात नवीन स्थानकात अस्वछतेचे साम्राज्य सतत पाहवयास मिळते त्यात नियोजित वेळेत बसेस आगरातून निघत नसल्यामुळे महिला व लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
शिवाय प्रवासी संख्या व बसेस ची संख्या यांचे ताळमेळ बसविण्यात आगार प्रमुख यांना शक्य होत नसल्याचे चित्र सतत बघावयास मिळते.