कोपरगाव : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा इ. १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विज्ञान शाखेचा ९७.६६%, वाणिज्य शाखेचा ८२.३०%, कला शाखेचा
६०.२८% व किमान कौशल्य शाखेचा ७६.१९% निकाल लागला असून एस एस जी एम कॉलेजची १२ वीच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे .
गुणानुक्रमे विज्ञान शाखेत कु. सोनवणे श्रुती विनोद ८६.१७% (प्रथम), चि. ठोंबरे ऋषिकेशनिखील ७८.८३% (द्वितीय), कु. कदम दिक्षा रवींद्र ७८.२३% (तृतीय), वाणिज्य शाखेत कु. विखे पुजा बाळासाहेब ८७.१७% (प्रथम), कु. विखे भक्ती सोमनाथ ८४.६७% (द्वितीय), चि. पवार कार्तीकेश रामचंद्र ८०.८३% (तृतीय), कला शाखेत कु. शेख सीमा कैसर ७७.८३% (प्रथम), कु. शेख सिफा कैसर ७५.६७% (द्वितीय), कु. शिंदे अश्विनी संतोष ७०.१७% (तृतीय), किमान कौशल्य शाखेत चि. पाटील श्रवणकुमार हेमंत ६०.८३%
(प्रथम), चि. खोंड आदित्य अमिर ५७.५०% (द्वितीय), चि. शेख अलबक्ष महेबुब ५६.३३% (तृतीय) आलेले विद्यार्थी असून महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगिरथ
शिंदे, सदस्य सौ. चैतालीताई काळे, विवेक कोल्हे, अॅड. संदीप वर्पे, सुनिल गंगुले, महेंद्रशेठ काले, बाळासाहेब आव्हाड, प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, प्रा.डॉ. रणधीर देविदास, प्रा.डॉ. यशवंत माधव, प्रा.डॉ.सौ. रांधवणे प्रतिभा, प्रा.डॉ.मालपुरे निलेश, अधिक्षक सुनिल गोसावी, प्राचार्य डॉ. रमेश सानप, उपप्राचार्य संजय शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, व्हाईस
चेअरमन, सचिव, सहसचिव यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.