बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपरिचारिकांनी बेमुदत धरणे आंदोलन करून प्रलंबित असलेली पाठयनिरदेशिका ट्युटर ची पदोन्नती त्वरीत देण्याच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधीपरीचारिकानी मोठ्या संख्येने १० जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली असून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या हजारपेक्षा जास्त परिचारिकांनी पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला आहे,२००७ पासून सेवांतर्गत पी.बी.बीएससी.उत्तीर्ण झालेल्या राज्यातील कोणत्याही अधीपरीचारिकाना नियमात तरतूद असतानाही अजूनपर्यंत एकाही परिचारिकेला पदोन्नती दिली नाही.
२००७ पासून आज पर्यंत सेवा अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना डावलण्यात आले आहे आणि अन्यायाची परिसीमा झालेली आहे वीस ते पंचवीस वर्षाची सेवा देऊनही सेवा अंतर्गत पी बी बी एस सी केलेल्या उमेदवारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही,
त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यात आलेला नाही. याउलट इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांच्या मार्गदर्शक सूचनांना डावलून महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सरळ सेवेची भरती केलेली आहे १९६४ च्या सेवा प्रवेश नियम व २०२१ च्या सेवा प्रवेश असे वेगवेगळे सेवा प्रवेश नियम लावून सरळ सेवा भरती केलेली आहे आधीपरिचारिका या पदावर रुजू झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामध्ये दोन वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण केला आहे.
शासन सेवेमध्ये त्यांनी शासनाला वीस ते पंचवीस वर्ष सेवा देऊनही त्यांना पदोन्नती न देऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे याबाबत २००७ पासून २०२१ पर्यंत रिक्रुटमेंट रुल्स (आर आर) तयार करण्यात आले आणि नवीन आर आर जे तयार झाले ते आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक असे आहेत त्यामुळे पाठ्यनिर्देशिका पद (ट्यूटर ) पदोन्नतीने भरण्यात आलेले नाही हा अन्याय दूर करण्याकरिता अनेक वेळा शासनास सार्वजनिक आरोग्य विभागास पाठपुरावा केला. अनेकदा आंदोलने केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर बेमुदत धरणे आंदोलनाची वेळ आली आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अधीपरीचरिका आपल्या कुटुंबातील लहान मुलांसह मुंबईत दाखल झाल्या आहे. बुलडाणा जिल्ह्यातून कैलास गांधरे, पौर्णिमा भास्करराव जाधव, सपना काकडे हे आपल्या मुलाबाळांना घेवून मुंबईत आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन महाराष्ट्र भर उभारल्या जाईल असा इशारा पौर्णिमा भास्करराव जाधव यांनी प्रशासनाला दिला आहे.