सातारा/अनिल वीर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) सातारा जिल्हा शाखेच्यावतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृती व मनाचे श्लोक शिकवण्यास त्वरित बंदी घालावी.मुंबई विद्यापीठांमध्ये सुरू असणारा मंदिर व्यवस्थापन हा कोर्स त्वरित बंद करावा.माण, खटाव व कोरेगाव दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश फी माफ करावी.नगरपालिका सातारा जकातवाडी येथील सौर प्रकल्पाची त्रियस्थ संस्थेच्या माध्यमातून चौकशी करावी.गाव तिथे संविधान भवन बांधण्यात यावे.आदी मागण्यांसाठी मंगळवार दि.18 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.