जेएनपीए दि २१(विठ्ठल ममताबादे ): महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कस युनियन,पारंपारिक मच्छीमार बचाव सामाजिक कृती समिती व कांदळवन विभाग महाराष्ट्र राज्य, रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कांदळवन दिनाचे औचित्य साधून रविवार दि २१ जुलै २०२४ रोजी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा या गावातील श्री हनुमान मंदिर येथे जागतिक कांदळवन दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी,वन परिक्षेत्र उरणचे अधिकारी एन जी कोकरे तसेच इतर मान्यवरांनी कांदळवनाचे महत्व तसेच जागतिक कांदळवन दिन का साजरा केला जातो याची सविस्तर माहिती दिली.
नागरिकांच्या विविध शंका,समस्यांचे समाधान यावेळी करण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध उपक्रम,प्रकल्प याविषयी ग्रामस्थांना नागरिकांना माहिती देण्यात आली.मंदिरात कांदळवनशी संबंधित निसर्गाचे संवर्धन संरक्षण करणारे निसर्ग चित्राचे सुंदर अशा रांगोळी रेखाटण्यात आली.सर्व मान्यवरांनी सदर रांगोळीचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित सर्वच ग्रामस्थ, उपस्थित सर्वच मान्यवरांनी हनुमान कोळीवाडा गावाला लागून असलेल्या खाडीच्या किनाऱ्यावर कांदळवन परिसरात साफसफाई केली.या उपक्रमात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचाही उत्तम प्रतिसाद लाभला होता.यावेळी एन. जी. कोकरे. वन परिक्षेत्र अधिकारी उरण.नंदकुमार पवार- अध्यक्ष महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडीशनल फिश वर्कर्स युनियन,रमेश भास्कर कोळी-अध्यक्ष पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समिती, सुरेश दामोदर कोळी-अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा,सुनील महाडिक – वनपाल वन विभाग,महेश राजपूत -अध्यक्ष
रोटरी क्लब कळंबोली,भरत शिंदे- सचिव रोटरी क्लब कळंबोली, माजी अध्यक्ष- साधना भगत, प्रेसिडेंट इलेक्ट – प्रसाद पाटील, जेष्ठ रोटरीयन सय्याजी साळुंके, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिम्पनीचे सौरभ सोमाणी. गंगाधर चिटकरे जिल्हा समन्वय अधिकारी,आशा वाले-वन रक्षक,परमानंद कोळी, माजी सरपंच ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा,मंगेश कोळी -उपाध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा, डोमनिक कोळी उरण कोळीवाडा,तुकाराम कोळी उरण कोळीवाडा,कृष्णा कोळी गव्हाण कोळीवाडा, तसेच ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होते.अशा प्रकारे जागतिक कांदळवन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कस युनियन,पारंपारिक मच्छीमार बचाव सामाजिक कृती समिती व कांदळवन विभाग महाराष्ट्र राज्य,रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या साफसफाई उपक्रमाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे.