बजेट कडे डोळे
लागून राही लक्ष
ठरल्याप्रतिक्रिया
देतात प्रत्येकपक्ष
मध्यमवर्गीयाकडे
केले पुन्हा दुर्लक्ष
कर वसुली करता
हाचं होणारं लक्ष्य
मत दान करताना
नेहमी असतो दक्ष
सत्तेत येवो कुणी
ठरले कपाळमोक्ष
उपेक्षित हाचं वर्ग
योजनांचे दुर्भिक्ष
सहनशीलताभारी
समस्या जरी लक्ष
महागाई भडकता
सोसे जाळ प्रत्यक्ष
संकट येता कुठले
भरडला जा समक्ष
कर्ज हप्ते नियमीत
भरत जाई निरपेक्ष
कर्जमाफी सूटबीट
फिरे यांचे अपरोक्ष
कुठे नसे लाभार्थी
केला जातो कैपक्ष
फायदेगरीबश्रीमंता
बंद या वर्गा गवाक्ष
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६..
2
मातृत्व ..
यशस्वी होता काही
उफाळून येते मातृत्व
चुकून घडता चूक ती
कुणी घ्यायचे पितृत्व
वरतीजायला लागता
आकर्ष खेचे गुरूत्व
काय करु काय नको
गाजवे फुकाचेप्रभुत्व
किंमत देता एखाद्या
वाढवून ठेवतो महत्व
सल्ले ते देत राहतात
पाघळूलागते कवित्व
मदतीच्या वेळी मागे
कुठे हरवते ते बंधुत्व
फुकटचेकाही वाटता
सळाळ करते दातृत्व
सुयश चुकून प्राप्त हो
जागे प्रसिद्धी लोलुत्व
हतबल पडल्या बाजू
करणारं कोण नेतृत्व
प्रकाशझोत डोळ्यात
भक्ताचे वाढवे अंधत्व
अवलंबून ठेवी नेहमी
आले अकाली वृद्धत्व
कूस चांगली उजवते
टोमणेमारून वंध्यत्व
गाजवू पाहता वर्चस्व
दाखवायला अस्तित्व
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.