जत दि.11 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचलित राजे रामराव महाविद्यालय जत येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा 37 व्या स्मृतिदिनानिमित्त महविद्यालयातील ज्युनिअर विभागाकडील सांस्कृतिक विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “दुर्मिळ नाण्यांचे व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन” घेण्यात आले.
या दुर्मिळ नाणी प्रदर्शन मध्ये प्राचीन नाणी, मुघलकालीन नाणी, शिवाजी महाराजाची शिवराई, ब्रिटीशकालीन नाणी, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्ती नंतरीची नाणी, विदेशी नाण्यांचा समवेश होता. महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.पुंडलिक चौधरी व कनिष्ठ विभागातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.सरदार रोहिले यांनी नाण्यांची निर्मिती करणारे राजघराणे, वापर कालखंड व नाण्यांचे ऐतिहासिक महत्व याविषयी विस्तृत माहिती दिली.
श्रीमंत विजयसिंहराजे डफळे ग्रंथालयामध्ये शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर आधारित लिहिलेला विविध पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन मांडण्यात आले. ज्युनिअर विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास भेट देऊन बापूजींचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यातील योगदानाची माहिती करून घेतली. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे स्वातंत्र्य चळवळीमधील सहभाग व योगदान याविषयी माहिती ग्रंथालय प्रमुख प्रा.अभयकुमार पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. दुर्मिळ नाणी व ग्रंथ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ विभागातील एन.सी.सी. प्रमुख कॅप्टन प्रा.पांडुरंग सावंत, सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.रवींद्र काळे व ज्युनिअर विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.