कोपरगाव प्रतिनिधी :महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या नाराधमांवर शरियतमधील कायद्याप्रमाणे कठोर शिक्षाच द्या वी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे वहाडणे पुढे म्हणाले की संपूर्ण देशभरातच मुली-भगिनी-महिला सुरक्षित नाहीत कि काय? असे वातावरण तयार झालेले आहे.सर्वच पक्ष अशा दुर्दैवी घटनांचा आधार घेऊन राजकारण करत असल्याचे दुर्दैवी चित्रही आहे.
छेडछाड-बलात्कार-लव्ह जिहाद-विटंबना-खून करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाकच वाटत नसल्याने मुली व महिलांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. अशा दुर्दैवी घटनांचा बंदोबस्त करण्यासाठी, आता या लिंगपिसाट नराधमांना शरियत मधील शिक्षाच देणे योग्य ठरेल असे वाटायला लागले आहे.दगडांनी ठेचून मारणे-हातपाय व लिंग छाटून टाकणे-फाशी देणे-गोळया घालून यमसदनी पाठविणे याच शिक्षा आजतरी आवश्यक आहेत.निदान महिलांच्या सुरक्षिततेसाठी तरी अपवाद म्हणून *शरियत मधील शिक्षाच द्या या मागणीला सर्वधर्मीय पाठिंबा देतील असे वाटते.राजकारण्यांनी मतांचा हिशोब न करता सर्वधर्मीय महिला-मुलींच्या संरक्षणासाठी तरी कठोर कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे.आज महिला अत्याचाराविरोधात कंठ फुटलेल्या पुढाऱ्यांनी लव्ह जिहादविरोधातही वेळोवेळीआवाज उठविला असता तर बऱ्याच मुली सुरक्षित राहिल्या असत्या. नेत्यांनो सतत मतांचे राजकारण करू नका, अन्यथा या नराधमांपासून आपल्या कुटुंबालाही धोका निर्माण होऊ शकतो याचे भान ठेवा.नराधम गुन्हेगार कुठल्याही जातीधर्माचे असोत त्यांचा नायनाट केलाच पाहिजे. असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.