पोहेगाव बुद्रुक नंबर 2 सोसायटी कडून लाभांश देऊन सभासदांची दिवाळी गोड 

0

कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील पोहेगाव बुद्रुक नंबर 2 विकास सोसायटीने चालू आर्थिक वर्षात सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी संचालक मंडळाच्या निर्णयानुसार सभासदांना 10 टक्के लाभांश रोख स्वरूपात दिला. यामुळे सभासदांची दिवाळी गोड होणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी सांगितले. संस्थेच्या मार्गदर्शक नितिनराव औताडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून संस्था विकासाकडे वाटचाल करत असून संस्थेने चालू आर्थिक वर्षात विविध विकास कामे केली आहे असेही त्यांनी सांगितले.

प्रतिनिधिक स्वरूपात सभासद प्रतिनिधी म्हणून गोरक्षनाथ जोंधळे यांना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे व संचालक मंडळाच्या वतीने लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाअध्यक्ष अशोक वाके, सुनिल बोठे,अनिल औताडे,दिलीप औताडे,संजय औताडे,कैलास औताडे,अनिल औताडे,सुनिल हाडके, सौ.सिमाताई औताडे,सौ.यमुनाबाई लांडगे, सोमनाथ सोनवणे,मधुकर भालेराव, सभासद अशोक औताडे,चांगदेव पाचोरे,गणेश गोसावी, आण्णासाहेब औताडे ,रंगनाथ देशमुख, गोरक्षनाथ जोंधळे, भीमा औताडे, सचिव संदीप फटांगरे आदी उपस्थित होते. शेवटी सचिव संदीप फटांगरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here