नव वर्षाचे स्वागता
सुसज्ज बाजारपेठा
चित्ताकर्षकवस्तुंचा
मुबलक मस्त साठा…
भेटवस्तू नव्यानव्या
आप्तेष्टा मित्रां वाटा
साजरे रे थर्टी फर्स्ट
उपलब्ध कैक वाटा…
थर्टीफर्स्ट फस्ट डेला
आवर्जून सर्वां भेटा
नवीन वर्ष सजलेले
बांधला अदृश्य फेटा…
स्वागत भिन्न पध्दती
हा कसा आटा पिटा
पारंपरिक नको वाटे
ना मार्ग घिसापिटा…
वेगळे काही करायां
सातत्ये व्यग्रते झटा
लक्षात रहावे सु क्षण
भरला दोस्तीचाकट्टा…
फॅशन झाली केवळ
दिमाख दावी खोटा
स्वच्छमनाने स्वागत
उघडता नव लखोटा…
जुन्या वर्षाचे ते पान
आठवण हळू पलटा
संधी मिळे जगायची
विचारकरावा सुलटा….
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
2
महोत्सव ..
जुन्यावर्षा सुखेटाटा
कृतज्ञताशब्द अधरा
नव साल स्वागतार्थ
सजली अवघी धरा…
वर्ष पूर्ती महोत्सव
करा सुखात साजरा
निमीत्ताने या करावे
आत्मनिरीक्षण जरा…
डोकवा भुतकाळात
सिंहावलोकन करा
काय बरोबर चुकले
विचार करावा खरा…
आम्हीचं शक्तीमान
नको उगाचं नखरा
चालण्या आधी पुढे
जाणावाभाग दुखरा…
कर्तृत्व आपले दिसो
सन्मानाचा हा तुरा
विरोधकांनी म्हणावे
नको फुकाचा तोरा…..
खुर्ची अस्थाई असते
जसा अवखळ पारा
लक्षात रहावे नाव रे
असामिळावा मुजरा…
संकल्प असाचं करा
जो करु शकालं पुरा
प्रकल्प होता अपुरा
नसावा फुका त्वंपुरा…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.