वाचन संकल्प महाराष्ट्राचा ;के. जे. सोमैया महाविद्यालयात सामूहिक वाचन

0

कोपरगाव :  
“वाचनाने माणूस घडतो. वाचन हे मानवी मनाचे आणि एकूणच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नियमित अभ्यासक्रमासोबतच आवांतर ग्रंथांचे वाचन करणे नितांत आवश्यक आहे,”असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत ‘सामूहिक ग्रंथ वाचन’ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रो.  ठाणगे बोलत होते. 
     

यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच वाचन-कौशल्य विकसित व्हावे यादृष्टीने हिंदी विभाग प्रमुख प्रो. जिभाऊ मोरे यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या प्रसिद्ध ग्रंथांचे संदर्भ देत मोलाचे मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. नीता शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ‘वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा’ आदी सर्व उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले,  तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी तृतीय वर्ष संगणक विज्ञानचा विद्यार्थी शेखर गाडगे याने ‘म्हणूनच आज माणुसकी विकली जाते’ या  कवितेचे सामूहिक वाचन घेतले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी  कवितेचे सामूहिक वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमाला विज्ञान शाखाप्रमुख प्रो. बापूसाहेब भोसले व वाणिज्य शाखा प्रमुख प्रो. संतोष पगारे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  या कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शविली. ग्रंथालय विभागाचे विकास सोनवणे, रवींद्र रोहमारे, स्वप्निल आंबरे , गणेश पाचोरे अजय पिठे,आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here