हडपसर प्रतिनिधी
पंजाब येथील गुरु काशी विद्यापीठ, भटिंदा येथे झालेल्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेजमधील वैष्णवी सतीश वाघमारे या विद्यार्थिनीने सिल्वर मेडल मिळविले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी. साळुंखे यांनी तिचे अभिनंदन करीत तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तिने मिळविलेल्या या यशामध्ये फिजिकल डायरेक्टर प्रा. दत्ता वासावे, उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचे मोलाचे योगदान आहे.