स्वामीश्रीविवेकानंद
जगता आपले ऋण
चरित्र करे उत्खनन
सापडे असंख्य गुण
भेटता रामकृष्णगुरू
बदलून गेले रे जीवन…
आधीचं विचार भले
झाले अधीक पावन
छंद अद्भुत स्वामीस
विविध भाषा वाचन….
शास्त्रीय गान वादन
भाषण अन् विवेचन
पाश्चात्य जगता दिले
वेदांत योगाचे दर्शन…
गरिबी जरी भारता
संस्कृती अति सधन
गाजले कितीभाषण
बंधू भगिनी संबोधन…
आम जनतेचे समस्त
करीत फिरे प्रबोधन
पिढ्या वाचे आवर्जून
सिध्द प्रसिद्ध प्रवचन…
नितळ तळ रे निर्मळ
करता सार्थ विवेचन
सर्वांभूती सेवा कार्य
सुरू रामकृष्णमिशन
आयुष्य अत्यल्पजरी
जगतात नाम रोषण…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.