टकारी समाज बांधवांचा राज्यस्तरीय वधु वर मेळावा संपन्न.

0

बारामती शहरात हजारो वधूवरांची नोंदणी

बारामती : बारामती टकारी समाज विकास संस्था अंतर्गत बारामती टकारी समाजाच्या वतीने टकारी  समाज वधु वर सूचक मेळावा व युवकांसाठी उधोजक मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी डॉ. सुधिर बाबुराव जाधव (लातुर) MA. BED SET, MBA DGDS LLB Phd यांनी उपस्थित युवक, महिला व समाज बांधवांना व्यवसाय कसे करावे त्यासाठी लागणारे कर्ज कसे मिळवावे यातून उद्योग कसा करावा यासाठी सुंदर असे मार्गदर्शन केले,त्याच बरोबर समाजातील वधू-वर यांच्यासाठी राज्यस्तरीय मोफत वधू-वर व

पालक परिचय मोफत मेळाव्यात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तसेच चहा नाष्टा, जेवणाची सोय केली होती. बारामतीतील राधा कृष्ण मंगल कार्यालय बारामती याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यासाठी राज्यातून  वधू-वरांची नोंदणी केली, या मेळाव्यासाठी हजारो समाज बांधव भगिनी उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजन,आयोजक व संपर्क प्रमुख अनिल गायकवाड(मा. उपनगराध्यक्ष), संतोष जाधव(पत्रकार),शेखर गायकवाड,सुभाष जाधव(सरपंच),बाळासाहेब गायकवाड,गणेश गायकवाड,ओंकार जाधव, महेश गायकवाड,संदीप जाधव,संतोष गायकवाड,सयाजी गायकवाड,महेंद्र गायकवाड,अशोक जाधव, संजय गायकवाड,संजय जाधव,विलासतात्या गायकवाड,राहुल जाधव, किरण गायकवाड, लखन गायकवाड,चिंगप्पा जाधव,मयुर जाधव,अनिल जाधव यांच्यासह अनेकांच्या वतीने उपस्थित समाज बांधवांचे जाहीर सत्कार करून आभार मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here