बाळासाहेबांची ती
खास ठाकरे शैली
एकमेवाद्वितीय रे
कधी नाही पहिली…
मन मोकळे बोलणे
शिव्यांची लाखोली
कटूशब्द औषधाचे
गोड भासते बोली…
बोलाया उभे राहता
वाजे जोरात टाळी
तोफ थडाडेल कुठे
आजकुणाची पाळी…
सहज बोले तरीही
नाद पोचे आभाळी
बदले सारे भविष्य
नवीन नांदी भाळी…
विचार स्पर्शे हृदया
जाणवे खरी खोली
करारी कठोर जरी
स्नेहाची कळे ओली…
भिती दावीलं त्यांना
माय कुणाची व्याली
चळाळ कापती सारे
रे चूक ज्यांनी केली…
शब्दाशब्दांत जाणवे
मराठीमातीची ओली
दूरदर्शी विचार सार्थ
सागरा परिस खोली…
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
2
नाव बाळासाहेब ..
बाळासाहेब ठाकरे
व्यक्तीमत्व ते न्यारे
उलट्या वाटे जाता
दिसेल दिवसा तारे…
खणखण होई वार
अरे म्हणताचं कारे
ना अंगचटीला येऊ
दिधले सरळ इशारे…
बोले बिनधास्त बोल
पुराव्यांच्या आधारे
ऐकूनचं नाव ठाकरे
भला भलाही सुधारे…
मराठी अस्मिता जागे
संपले सगळे नखरे
मराठी माणसा तुला
कळे शक्तीरूप खरे…
निर्भय बनवले सर्वां
रेभगवा सन्माने धरे
दिल्लीतही म-हाठी
नांव झळकते आदरे…
भाव बंधना जाणूनि
इथे रहावे सौख्यभरे
ते हृदयसम्राटविचार
आता पदोपदी स्मरे…
बाळासाहेब स्मारक
मनात एखादं उभारे
आचरण करता जरा
किर्ती जाईलं नभा रे…
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
सर नमस्कार
बाळासाहेब ठाकरे जयंती..