मऱ्हाटी राज्य यावे
फडकवा उंच भगवा
देशासाठी सुपुत्र दे
आऊ मागते जोगवा…
स्वप्न येवू पाहे सत्या
बदले शिवनेरी हवा
दगड माती मोहरले
जन्मास येता शिवा…
आकाश झाले मुक्त
सुखे घुमतो पारवा
आले दिस आनंदाचे
सुगंध उधळे मरवा…
उन्हाळा मोगलाईचा
हवेत ये गार गारवा
येणार आपला राजा
हसला गनिमी कावा…
माता भगिनी रक्षणा
तारणहार रे पाठवा
गौ ब्राह्मण दीनबोले
रूपडे नयनी साठवा
इतिहास पाने म्हणे
अध्याय नवा गिरवा
वठून गेलेला निसर्ग
रंग पांघरतो हिरवा
पराक्रम रोमा रोमात
शत्रूही करेल वाहवा
प्रत्येक माता मागेलं
मज पुत्र असा हवा
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
अंश ..
शिव छत्रपती चरित्र
आचरणात आणता
होईल प्रसन्न खरा
तेव्हा राजा जाणता
वाढवा स्मारक उंची
मन मात्र नको खुजे
राष्ट्रप्रेम रोमा रोमात
प्रसन्न होतील राजे
नको असे हीनधोरण
मतांस्तव राजकारण
छत्रपती राहती तिथे
जे स्वच्छ अंतःकरण
ज्यांचे मन रे निरंकार
नाही अहंकार विकार
छत्रपती शिवरायांचा
त्याने करावा जयकार
शिवा अपेक्षितहिंदुत्व
मना मनात ते जागवा
सकलासन्माने वागवा
त्या हाती शोभे भगवा
शिवबा गुणांची खाण
जाणा जागवा अंश
म्हणा खुशाल तेव्हा
छत्रपतींचे आम्ही वंश
– हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६