वात्सल्य पूर्ण माती
प्रसवे अमूल्य मोती
शतकोत्तर एखादे
जन्मा येती छत्रपती
मान मिळे शिवनेरी
निसर्ग पोवाडे गाती
आऊ कूस हि-यांची
लखलख उजळती
शिवबा विश्वा मिळे
परीस जयांचे हाती
महाराष्ट्र झगमगला
दिशांत पसरे किर्ती
पिढ्यान् पिढ्या ती
उसळे उर्जा स्फुर्ती
कर्तुत्ववान छत्रपती
शत्रूही करती प्रिती
मित्रमावळे जमवले
देशावरी करी भक्ती
स्वराज्य सुराज्य हो
तुळजाई देई शक्ती
शिवा गुणांची खाण
सत्तेची नसेआसक्ती
लोक अनुग्रहासाठी
राजे शोभले तख्ती
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
2
शिव जयंती ..
अखर्वात एखादाचं
महापुरुष असामान्य
शिवनेरीचं भाग्यवान
सुख कुठे नसे अन्य
शिवबासम ना दुजा
कुल छत्रपती मान्य
राजा करुन शिवाला
रयतचं जाहली धन्य
मेघ भाराऊन जाती
आनंदे बरसे पर्जन्य
स्नेहाळ झाली धरती
ये सुख समृद्धी धान्य
समाधान असामान्य
नाचती जन सामान्य
उत्साह येतो उत्सवा
सोहळा कुठे न अन्य
भगवा हाती धरूनि
रक्षणार्थ सज्ज सैन्य
उपाशी कुणी न निजे
पळवून लाविले दैन्य
मानवा सहित सुखी
पशू पक्षी प्राणी वन्य
राज्यात शिवरायतव
दु:ख वेदना उरे शून्य
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996