कवी संमेलनातून कवी, प्रेषकांनी लुटला गझलाचा आनंद 

0

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )

उरण शहरातील  विमला तलाव येथे दर महिन्याच्या १७ तारखेला कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मधुबन कट्टयाचे कविसंमेलन घेण्यात येत असते. या महिन्याच्या १७ तारखेला ११२ वे कविसंमेलन भुवनेश्वर पाटील यांचे अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाले .यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर यांनी श्रोत्यांना गझलांचा भरभरून आनंद दिला. असे विचार भुवनेश्वर पाटील यांनी मांडले.या कार्यक्रमात उरणातील सुप्रसिद्ध नाट्यकलाकार यशवंत तांडेल,पांडुरंग घरत आणि शिक्षक संजीव पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन पत्रकार तृप्ती भोईर आणि आप्पा ठाकूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील,मधुबन अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, सूर्यकांत दांडेकर, नीळवर्ण दत्ताराम, रमाकांत म्हात्रे अरविंद घरत, सुभाष मुकादम, सुरेश भोईर, नरेश ठाकूर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती 

           

या कार्यक्रमातील कविसंमेलनात मच्छिंद्र म्हात्रे, संजय होळकर,अजय शिवकर, शिवप्रताप पंडित,तृप्ती भोईर, हेमंत पाटील, अनुप शिवकर, अनामिका राम, तेजस्विनी,शर्मा, भालचंद्र म्हात्रे, संग्राम तोगरे,रामचंद्र म्हात्रे, मारुती तांबे इत्यादी कवींनी श्रोत्यांना मनमुराद आनंद दिला. जीवनाचा वास्तव रूप देणे आम्हा कवींना आवडते.येथे ज्या कविता सादर केल्या आहेत, त्यावरून १७ तारखेला उरणला बहर येतो, असे आपल्या गझल करतांना कवीनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म.का. म्हात्रे यांनी आणि सूत्र संचालन संजय होळकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here