गणगणगणात बोते
घे गजानन मंत्रमहा
जीव शिव अंतरात
मंत्रोच्चार करत रहा…
श्री गजानन विजय
चमत्कार कसा पहा
रे दासगणू विरचीत
महा ग्रंथ सार्थ अहा…
अध्यायाचे अध्ययन
भक्ती अमृतात नहा
स्वामींचे नामस्मरण
धन्य धन्य हो जिव्हा…
षड्रिपु ते क्रूर समस्त
नामयज्ञात हो स्वाहा
महाराज रे ठाई ठाई
उजळल्या दिशा दहा….
सत्शील निर्मळ वागा
गजाननाच्याअनुग्रहा
रे दुराचारा दूर सारा
पुण्य संकलन संग्रहा…
शांती द्या भक्तोधारा
मनातल्या या विद्रोहा
चरणी तुझ्या लीनता
मुक्त करी कारागृहा…
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996
योगीराणा ..
शेगावीचा योगीराणा
अवधूतरुप अवलिया
जागोजाग दिसे खुणा
किती केल्या किमया
अन्न उष्ट्या पत्रावळी
परब्रम्ह लागे खावया
सिध्दपुरुष अवतारला
समर्थ दत्त सांप्रदाया
मध माशा शरणागती
संकटे सोडवी लीलया
व्याधी मुक्त जानराव
आंबा देत त्या खावया
ब्रह्म गिरीचे गर्व हरण
ज्ञानलागता पाजळाया
अकोली कोरडी विहीर
पाणी भरले जलाशया
खंडू पाटला पुत्र प्राप्ती
गेले दुःख सगळे लया
विठ्ठलाचे दर्शन दाविले
पाटील करी गयावया
भक्त वत्सल धाव घेतो
सोडवाया संकट समया
साक्षात्कार भक्ता होई
तेवल्या लक्षलक्ष समया
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996