पुस्तकांचा मला
लागलायं लळा
घरामध्ये फुलला
वाचनालय मळा…
अब्दुल कलाम
क्रांती सूर्य निळा
स्वामी विवेकानंदे
वारसा हा दिला…
घरा मध्ये भरली
पुस्तकांची शाळा
कपाटाला कुठला
लावला ना टाळा…
या बसावे वाचावे
ग्रंथ सगळे चाळा
पुस्तक चोरायचा
मोह तेवढा टाळा…
वाचा तासन् तास
येणार न कंटाळा
गुंग होतात सारे
कळणार ना वेळा…
चिकटे गोड गुळा
म्हणे मज मुंगळा
लोक काही हसती
समजे वेडा खुळा…
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
गोड सवय …
गोड गोड गुळा
चिकटला मुंगळा
लागे तसा मजला
पुस्तकांचा लळा…
भिमरावजी बाबा
क्रांती सूर्य निळा
वाचनाचा आनंद
वारसा दे सकळा…
किती केवढे ग्रंथ
फुलला तो मळा
कपाटाला कुठला
लावला ना टाळा…
वाचायला पुस्तके
जन होती गोळा
जमता असा मेळा
सुखानंद आगळा…
द्यावे घ्यावेत ग्रंथ
संम्मेलन सोहळा
पुस्तक चोरण्याचा
मोह विचीत्र टाळा…
समृध्द करे सकळा
ज्ञान झरा खळाळा
पुस्तक प्यारा मित्र
दुजा नसे जिव्हाळा…
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६