शतधन्य बा ज्ञानदेवा
उघडलीस अंती ताटी
अभिजात दर्जा प्राप्त
तुझी लाडकी मराठी
सरसावले टिकाकार
जय घोष सर्वां ओठी
समोर येई सन्मानास
अभद्र बोलणारे पाठी
कसे घडले अद्वितीय
आश्चर्येचकित भृकुटी
कळता मराठी महत्व
हिरा जडवला मुकुटी
लढत राहिली एकटी
किती ती भलती हट्टी
दर्जा देताना भाषेचा
लावली मोठाली पट्टी
लिलया अडथळे जाई
पार सगळ्या कसोटी
पुरातन समृध्द वारसा
परिपूर्ण नियम न् अटी
अथकप्रयत्नांस सुयश
झुकले परिक्षक शेवटी
अधिराज्य गाजवे पहा
भाषा आपली गावठी
कितीकाळ ती प्रतिक्षा
का उगाचंच धरले वेठी
खजिना जाग्रत अद्भुत
उघडता ही जादुई पेटी
शिका मराठी .
यत्न हलकासा पुरेसा
शिकावी भाषा मराठी
स्वागता सुसज्ज शब्द
उघडती ज्ञानेश्वर ताटी
खजिना जाग्रत अद्भुत
उघडता ही जादुई पेटी
लकाकून जाईलं दृष्टी
अमूल्य अलंकार भेटी
सन्माने अभिजातदर्जा
विजय तिलक ललाटी
भाट होतीलं निर्भर्त्सक
टिकाकार मारी गुलाटी
भाषा वैभव प्रकाशात
परिपूर्ण समग्र कसोटी
चेष्टेखोर झाले हतबद्ध
गळूनि पडली कासोटी
मायबोली सोबत तुम्हां
मराठी स्फुरावी ओठी
समृद्ध ममत्व दाटीवाटी
या दिलदार मराठीपोटी
सावरे सहजते समतोल
आधारा सक्षम ही काठी
जिंकालं इप्सित लीलया
राही मराठी सदैव पाठी
मिळे सुखस्थ रोजीरोटी
स्वागत सर्वांचे महाराष्ट्री
संवेदना निदान रे छोटी
लाव उस्फुर्त मराठीपाटी
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.