गीतमैफिलीने शहीददिनाचा समारोप
सातारा : राष्ट्रहितासाठी भगतसिंग यांनी प्रतिकुल परिस्थिती असतानाही इंग्रजाविरोधार्थ लढले.असे प्रतिपादन लेक लाडकी अभियानच्या ऍड.वर्षाताई देशपांडे यांनी केले. शहीद भगतसिंग स्मृती समितीतर्फे शहीद दिन ठितकठिकाणी भरगच्च कार्यक्रमात अभिवादनाने साजरा करण्यात आला.समारोपप्रसंगी गोलबागेत झालेल्या कार्यक्रमात ऍड.देशपांडे मार्गदर्शन करीत होत्या.
यावेळी संगीतमय गितमैफिलीचा कार्यक्रम संपन्न झाला.शाहीर भानुदास गायकवाड’,युवा गायक कैलास,ऍड.हौसेराव धुमाळ आदींनी प्रेरणादायी गाणी गाऊन संपूर्ण राजवाडा परिसर दणाणून सोडला.यामध्ये शहीद अभिवादनपर गीते सादर करण्यात आली.शाहीर गायकवाड यांनी संपूर्ण कमांड सांभाळली होती.”स्वतंत्र भारत देशाची घटना बाबासाहेबांनी लिहिली.”हे गीत गायकवाड यांनी आपल्याच शैलीत गायले.”भीमरायाने तुझ्या जीवाची सर्वच घेतली हमी.” हे गीत ऍड.धुमाळ यांनी संविधानावर गायले.कैलास यांनी अन बया,… हे गीत गाऊन सांगता केली.शाम गडकरी यांची ढोलकी कडाडत होती.गाणी व मनोगत असा एकामागून एक क्रम होता.त्यामुळे उत्स्फूर्तपणे अनेकांनी सहभाग घेतला.
सदरच्या कार्यक्रमास अंनिसचे विजय पवार, डॉ.दीपक माने, प्रकाश खटावकर,माणिक आढाव,विविष क्षेत्रातील मान्यवर,भगतसिंग प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.याकामी, प्रा.आनंद साठे,परवेज सय्यद, विनायक आफळे,शिरीष जंगम, अरबाज शेख,शशिकांत बडेकर, सादिकभाई बागवान, सलीम आतार,दत्ता राऊत,मनीषा साळुंखे, मनोज चाकणकर, सुभाष मदने,संजीव बोंडे,श्रीकांत कांबळे,उल्हास पुराणिक,नामदेव मदने,अनिल वीर आदी समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक असे परिश्रम घेतले.