पांडुरंग माने यांच्या पाठपुरवठ्याला यश ; जामखेडला टप्पाटप्य्यात २५ बस मिळणार

0

नवीन दोन एसटी बस जामखेड आगारात दाखल 

जामखेड तालुका प्रतिनिधी ;

जामखेड आगारातील खिळखिळ्या झालेल्या एसटी बस मुळे प्रवाशांसह कर्मचारीही वैतागले होते मात्र  राष्ट्रवादी काँग्रेसचे विभुक्त जाती भटक्या जमाती उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख पांडुरंग माने यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे जामखेड आगाराला एकूण २५ नव्या बस मिळणार असून यापैकी दोन एसटी  बस काल जामखेड आगारात दाखल झाल्या असून उर्वरित बस टप्पाटप्य्यात मिळणार आहे  

जामखेड आगार येथे जून्या बसेस मोडकळीस आलेल्या असून  यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. जुन्या बस मुळे जामखेड आगाराच्या उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणावर घट झाली असून नवीन बसेस जामखेड आगाराला  देण्यात यावे येऊन  या विषयाकडे विभागीय कार्यालयाचे विभाग नियंत्रक यांनी लक्ष घालावे अशी मागणी  पांडुरंग माने यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे  लावून धरली होती त्यानुसार जामखेड आगाराला २५ नव्या एसटी बस मिळणार असून यापैकी दोन नव्या एसटी बस जामखेड आगारात दाखल झाल्या असून १५ एप्रिल पर्यंत १० नव्या बस मिळणार असून उर्वरित १५ एसटी बस या दीड महिन्यात आगाराला मिळणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here