देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरात काम करण्यासाठी जरी कमी कालावधी मिळाला मात्र १ वर्षाच्या कालावधीत शहरवासीय व सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेले प्रेम हे कदापी न विसरण्यासारखे असल्याचे प्रतिपादन नगरपरिषदचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले. देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी नवाळे यांची संभाजीनगर महानगरपालिका उपायुक्तपदी बढती झाली असता समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक भवन येथे निरोप समारंभ पार पडला.प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक सुदर्शन जवक होते. मुख्याधिकारी नवाळे कार्यालयातून बाहेर पडल्यावर कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी केली.यावेळी व्यासपीठावर राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, नंदा नवाळे, धनश्री नवाळे, संभाजी वाळके आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना विकास नवाळे म्हणाले की, सरकारी नोकरी करत असताना बदली व बढती हे ठरलेले असते.परंतु काम करत असताना माणूस म्हणून आपण काय केलं हे खूप महत्वाचे असते. देवळाली प्रवरा शहरात काम करत असताना सर्वांचे सहकार्य मिळाल्याचे ते म्हणाले. मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, सुदर्शन जवळ, भारत साळुंके, भूषण झरकर, भास्कर जाधव, उदय इंगळे, बबन दिवे, स्वप्नील फड, दिनकर पवार, संभाजी वाळके, श्रीकांत जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनीतर आभार प्रदर्शन अभिषेक सुतावणे यांनी केले. यावेळी सर्व विभागप्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते.