तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची विशेष योजना
कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केलेली आहे राज्यातील प्रत्येक गावाच्या तलावातील गाळ काढून त्याचे पुनःर्जीवन करणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, यासाठी “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” तसेच “नाला खोलीकरण व रुंदीकरण” या योजना ताकदिने राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आलेला आहे. कोणतीही स्वयंसेवी संस्था अथवा ग्रामपंचायतीला या कामांसाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करण्यात येईल. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी विधवा अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.
शासनाची ही योजना गावागावात पोहोचवण्याकरता व शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याकरता प्रोत्साहन देण्याकरता जनजागृती आंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे, तसेच गाळमुक्त धरण हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बी.जे.एस.)आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे अशा प्रकारची काम व आणि हजारो गावात पाण्याची कामे करण्याचा अनुभव भारतीय जैन संघटना चे संस्थापक *शांतीलालजी मुथा* तसेच भारतीय जैन संघटनाचे सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावाचा मागणी अर्ज वर ऑनलाईन भरावा या योजनेच्या जनजागृतीसाठी सुहाना स्पायसेस यांनी भारतीय जैन संघटनाला सहकार्य केलेले आहे. योजनेची सर्व माहिती गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या शासनाच्या पोर्टलवर दिली असून त्यासाठी www.shiwaar.com ही वेबसाईट पहावी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी नाला खोलीकरण रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जैन संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
यासंदर्भात दिनांक 29 मार्च 2025 रोजी कोपरगाव येथे कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमती खेमनर जलसंधारण विभाग यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय येथे बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व शासनाच्या “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” महत्व उपस्थित त्यांना पटवून देऊन या संदर्भात लवकरच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची तसेच भारतीय जैन संघटनाचे समन्वयक व प्रतिनिधी यांची एक संयुक्तिक बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती यावेळी दिली. कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त गावांनी या उपक्रमामध्ये भाग घेऊन जलयुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार सावंत यांनी सांगितले.
बैठकीस भारतीय जैन संघटनाचे उत्तर अहिल्या नगर जिल्हा समन्वयक आनंद भंडारी, कोपरगाव तालुका प्रतिनिधी संतोष गंगवाल, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजयजी बंब, कोपरगाव तालुक्याचे शेतकरी पाणी अभ्यासक तुषार विद्वांस, अजय लोढा, अजय शहा, स्वप्नील भंडारी, अक्षय बोरा, ललित धाडीवाल तुषारजी बागरेचा आदींसह भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.