एस.एस.जी.एम महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

कोपरगाव प्रतिनिधी ०३ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व IQAC विभागांतर्गत “Advances In Life Sciences, Biodiversity And Conservation” या विषयावर मंगळवार,दि.८ एप्रिल २०२५ रोजी आभासी आणि प्रत्यक्ष प्रणालीद्वारे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे.
सदर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. डी. के. म्हस्के कुलगुरू,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या शुभहस्ते होणार आहे तर अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांच्या उपस्थित राहणार आहे.

या परिषदेसाठी डॉ. दीप्ती याकंदावाला, (प्रमुख,वनस्पतीशास्त्र विभाग,पेराडनिया विद्यापीठ, श्रीलंका)., डॉ. शक्तीकुमार सिंह,( शास्त्रज्ञ डी, एम.ओ.ई.एफ.सी.सी, नवी दिल्ली)., डॉ.एस.आर.यादव (‘इन्सा’चे मानद शास्त्रज्ञ वनस्पतीशास्त्र विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर)., प्राचार्य डॉ. सी. जे.खिलारे (शरदचंद्र पवार महाविद्यालय,लोणंद, सातारा) डॉ.पलट्टी अल्लेश सिनू,(सायंटिस्ट-सी, केंद्रीय विद्यापीठ, केरळ ) हे मार्गदर्शन करणार आहे. सदर परिषदेसाठी तरुण संशोधकांना वाव मिळावा म्हणून संशोधन पेपर सादरीकरण ठेवलेले आहे. सदर परिषदेसाठी संशोधकांकडून लेख मागविण्यात येणार आहे. सदर पेपर International Journal of Biology Sciences, ISSN: 2664-9934,
Comprehensive Publications, Delhi या जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे.

संशोधनाचे विषय खालील प्रमाणे आहे.
● Ecology, Environment and Biodiversity Conservation • Floristics & Nomenclature • Modern trends in Plant and Animal Systematics • Phytogeography and Ecology • Ethnobotany and Indian Knowledge System (IKS) • Medicinal Plants & Drug Discovery • Biotechnology,
Molecular Biology and Genetics
● Pharmacology, Physiology and Health Sciences • Medicinal Plants, Ethnomedicine, Application of Herbal Medicine • Nanobiotechnology and Nanomedicine • Immunology and Infectious Diseases • Synthetic Biology and Genetic Engineering • Sustainable Agriculture and
Food Security
खालील लिंकवर क्लिक करून परिषदेत आपला सहभाग नोंदवावा.सहभाग नोंदविण्याची अंतिम दिनांक ०७ एप्रिल २०२५ सकाळी १०.००. वाजेपर्यंत
लिंक – https://forms.gle/BrZqTZcSTxkBSsC76 पेपर पाठविण्यासाठी मेल आय डी- railsbc8@gmail.com

Whats up Group-
https://chat.whatsapp.com/Hkmng1zQLjjLp1CAfEE8VP
तरी जास्तीत जास्त विषयतज्ञ व अभ्यासकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे. या परिषदेचे मुख्य संयोजक डॉ.विलास जीवतोडे,प्रा.हंसराज मते व प्रो.डॉ. मोहन सांगळे (उपप्राचार्य विज्ञान शाखा) सदर परिषदेचे निमंत्रक डॉ निलेश मालपुरे हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here