एन.एम.एम.एस परीक्षेत २२७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत;सारथीसाठी १९२ विद्यार्थी पात्र

0

आत्मा मालिक पॅटर्न पुन्हा अव्वल’. संपूर्ण देशात आत्मा मालिक प्रथम स्थानी

कोपरगांव प्रतिनिधी : राष्ट्रीय आर्थिक दुबर्ल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे २२७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहे.
राज्यात एका शाळेत सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान दहाव्यांदा. आत्मा मालिकने मिळविला. या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे चार वर्षासाठी ४८००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

२२७ विद्यार्थ्यांना ०१ कोटी ८ लाख ९६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आत्मा मालिकचे आज पर्यंत १६८० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले असून त्यांनी ८ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी १९२ विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना प्रत्येकी ३८४०० रुपयांप्रमाणे ७३ लाख ७२ हजार ८०० रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार असल्याची माहिती गुरुकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.
एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या शाळांमध्ये २२७ विद्यार्थ्यांसह आत्मा मालिक प्रथम असून कोल्हापूरचे पी. बी. पाटील विद्यालय १६५ विद्यार्थ्यांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

या विद्यार्थ्यांनां प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रविंद्र देठे, सचिन डांगे, अनिल सोनवणे, रमेश कालेकर, मिना नरवडे, बाळकृष्ण दौंड पर्यवेक्षक सुनिल पाटील, नितीन अनाप, नयना शेटे, गणेश रासने, विषय शिक्षक अजय कांबळे, सोपान शेळके, अनिता वाणी, वैभव हारदे, अमोल कर्डिले, सुर्यकांत कऱ्हाळे, दिपाली भोसले, संदिप शिंदे, पाडूरंग वायखिंडे, ज्ञानेश्वर म्हस्के, वैशाली तांबे, पुनम खांडेकर, सोमनाथ व्यवहारे, दत्तात्रय गायकवाड, गणेश कांबळे, सचिन जगधने, सिद्धेश भोईर, करिष्मा  ढेपले, शिवांजली येसेकर, मंगेश थोरात, सुनील वाणी, सुवर्णा धनवटे, राजेंद्र जाधव, शिवम तिवारी, पंकज गुरसळ, पवार रिना, वनिता लोंढे, मीना सातव, आशाा देठे, अश्विनी जावळे, सर्जेराव भुजाडे, पुनम पावसे, अंजली तिवारी, पाचारणे अमोल, पुनम राऊत, बबन जपे, राजश्री पिंगळ, सुनंदा कराळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे परमपुज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशिर्वादास संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्षे, प्राचार्य निरंजन डांगे यानी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here