अवैध दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी राहुरी पोलिसांचा छापा

0

३८ हजार ६१० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त ;तीन जणांना अटक

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी : देवळाली प्रवरा येथील अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा मारुन 38 हजार 610 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुत तीन जणांना जेरबंद करण्यात आले.राहुरी तालुक्यात अवैध धंदे चालकांनी स्वतःहुन अवैध धंदे बंद करण्याचे आवाहन राहुरी पोलिसांनी केले आहे.आहे.

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथे  छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत असल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी देवळाली प्रवारा येथे छापा टाकला असता  गणेश रमेश गायकवाड याच्या घराजवळ गावठी दारु तयार करण्याचे काम सुरु असताना पोलिसांनी छापा मारला असता दारु तयार करण्याचे रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू असा 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनीजप्त करुन गणेश गायकवाड रा.देवळाली प्रवरा  यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दुसऱ्या एका ठिकाणी छापा मारला असता रवींद्र दिगंबर डुकरे रा. टाकळीमिया रोड देवळाली प्रवरा याच्या घराजवळ गावठी दारु तयार करण्याचे काम चालू असताना पोलिसांनी छापा टाकला.दारू तयार करण्याचे रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू असे एकुण   17 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी करण्याचे जागेवर नष्ट करुन रविंद्र डुकरे यास जेरबंद करण्यात आले आहे.

         

 गावठी दारु अड्ड्यावर छापा मारीत असताना देवळाली प्रवरा बाजार तळावर विनापरवाना  देशी दारूची विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामकिसन भागवत रा. शेटेवाडी रोड, देवळाली प्रवरा हा देशी विदेशी दारु विक्री करीत असताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून 1हजार 610 रुपये किमंतीची देशी व विदेशी भिंगरी संत्री नावाच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तीन वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात 38 हजार 610 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली  पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पो.हे.कॉ. बबन राठोड, पो.हे.कॉ. हनुमंत आव्हाड, पो.कॉ. गणेश लिपणे, पो.कॉ. शेषराव कुटे, पो.कॉ. अंबादास गीते, होमगार्ड शरद कोबरने, रवींद्र कदम आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here