व्यंगचित्रकारांमध्ये माणसाला ओळखण्याची जादू : नागराज मंजुळे

0

नगर : कला आणि कलाकार यांनी नेहमीच नगर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात कमविले आहे यंदाही हि बाब गौरवाची आणि आपल्या नगर जिल्ह्याला अभिमान वाटेल अशीच आहे कारण राज्यस्तरीय ‘विवेक रेषा’ व्यंगचित्र प्रदर्शन कार्यक्रमात महाराष्ट्रातील शेकडो व्यंगचित्रकारातून फक्त २५ नावे निवडण्यात आली आणि या यादीत नगर जिल्हयातील संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर व आनंद गायकवाड यांची निवड झाली पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विवेक रेषा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. 

 या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक “सैराट” फेम नागराज मंजुळे यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलतांना ते म्हणाले व्यंगचित्रकारांमध्ये अनेक गुण असतात आणि त्या गुणातुन व विवेक बुद्धीतुन रोज नवनविन व्यंगचित्र काढून जनतेला हसवत असतात परंतु त्यापाठीमागे खुप मोठा संदेश सुध्दा देतात.व आपणं ही आपले व्यंग,व्यंगचित्रकारा कडून काढायला हवे कारण व्यंगचित्रकारांमध्ये माणसाला ओळखण्याची जादू असते असे उद्गार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक “सैराट” फेम नागराज मंजुळे यांनी काढले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार मंजूल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पटकथा लेखक व नाटककार अरविंद जगताप यांनी आपल्या भाषणात पंडित नेहरू व आर. के. लक्ष्मण पासून ते इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या बाबतीत व्यंगचित्रकारांबद्दल अनेक उदाहरणे सांगून श्रोत्यांना  खळखळून हसविले. 

  अध्यक्षीय भाषणात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार मंजुल यांनी व्यंगचित्रकार व त्यांच्या समस्यांवर भाषण दिले. मुक्ता दाभोळकर यांनी कार्यक्रमाचे  प्रस्ताविक केले.मार्मिकचे गौरव सर्जेराव, हमिद दाभोळकर, तसेच संगमनेर साहित्य परिषदेचे रमेश काका सराफ, सुभाष कु-हे, बालकृष्ण महाजन, सय्यद असिफ अली, दिलिप उदमले,शेख ईदरीस, हेरंब महाजन, तसेच मोठ्या प्रमाणात श्रोते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here