मारूती गेला लंकेला
केली चाणाक्ष पाहणी
लाजवेलं रे धुरंधराला
अशीआगळी कहाणी
सेतू नाही सागरावरी
ते खोल किती पाणी
लंका कशी कुठे असे
खडा न् खडा जाचणी
भेटे सिता माऊलीला
वनवासी करारी राणी
लढा राक्षसी वृत्तीशी
मदतीला नाही कुणी
मारुती राया गुप्तहेर
करी अवघी टेहाळणी
दूत असूनही जाहली
भर सभेत हेटाळणी
रावणी अपराध काय
सांगे सारी खतावणी
शांतीचा अंतिमप्रयत्न
शून्य झाली बतावणी
जळे लंका वाजे डंका
बदलून टाके कहाणी
जळाली वृत्ती रावणी
जिंकला राम सद्गुणी
राम राज्य आले जगा
स्वप्न पूर्तता ही देखणी
वायु पुत्र होई निमित्त
प्रभू रामाची आखणी
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996
www.kavyakusum.com