धर्म मार्तंड ..

0

वाद  विस्पोटक करे
उगाचंच  धर्म मार्तंड
शरीरा पेक्षा बलाढ्य
रे मनातला अहम्गंड

परमेश्वर जन्म स्थळ
विवाद विषय  प्रचंड
सर्वज्ञ जाणे स्वताला
मस्तकी  उठला कंड

वक्तव्ये जळ जळीत
ऐकतो आम्हीचं  षंढ
आगभडकली समोर
रे  राहतो तरीही थंड

अंधश्रध्देत जखडले
कुप्रथेचे साखळदंड
विश्वास ठेवती कान
गुलाम बनलोअखंड

आंधळे  प्रेम करणारं
अनुयायी  असे उदंड
सुटतीलं ते  सलामत
आम्ही भोगणार दंड

ग्रासला सक्षम मनाले
असा कसा  न्यून गंड
अशक्ता समोर केवळ
विवाद घालतो वितंड

मातत  राहतीलं  पुंड
घरात  घुसणारं  झुंड
चुकीचे दिसता काही
कधी तरी  करावे बंड

हेमंत मुसरीफ पुणे.
  9730306996
  www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here