साहित्य हे समाजाला जोडणारे असावे, तोडणारे नसावे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

0

पुणे प्रतिनिधी :

 ” साहित्य हे जोडणारे  असावे  तोडणारी नसावे हा विचार समोर ठेवून साहित्यिकांनी आपल्या साहित्याची निर्मिती केली पाहिजे.साहित्याची भूमिका ही समाजाला एकत्र आणण्याची असली पाहिजे. साहित्य समाजाचे प्रतिबिंब आहे आणि त्यातून आपण समाजाला समजून घेऊ शकतो.साहित्य वेगवेगळ्या विचारांची आणि संस्कृतीची ओळख करून देते, ज्यामुळे समाजात सहिष्णुता आणि समजूतदारपणा वाढतो. आद्यकवी वाल्मिकी  आणि व्यासानपासून ही जी भारतीय साहित्याची समृध्द परंपरा  आलेली आहे. या समृद्ध परंपरेनेच भारतीय संस्कृतीला  चिरंजीवीत ठेवलेले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी म्हटलेले आहे की,’  जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव हा जग बदलण्याचा जो घाव आहे तो घाव हा समाज  जोडण्याचा आहे.जे परस्परांमधले विसंवाद आहेत ते बदलून  एकमेकांमध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे.यासाठी हा घाव घातला पाहिजे ही भूमिका  अण्णा भाऊंची आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मानवतावाद टिकून ठेवला आहे.हा आदर्श साहित्य व समाजासमोर ठेवला आहे.” असे प्रतिपादन पद्मश्री गिरीजी प्रभुणे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मातंग साहित्य परिषद पुणे यांच्या  प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाङ्ग्मय पुरस्कार 2025 च्या पुरस्कार वितरण समारंभ सोहळ्या प्रसंगी केले.

        यावेळी व्यासपीठावर प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड जिल्हा न्यायालय सुनील वेदपाठक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यवाह  मुकुंदराव कुलकर्णी, आमदार अमित गोरखे,माजी मंत्री दिलीप कांबळे, विलासराव लांडगे,शरद शिंदे,अनिल सौंदडे,डॉ.धनंजय भिसे,डॉ.संतोष रोडे उपस्थितीत होते.

           नांदेड जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक व पद्मश्री गिरीश प्रभुणे  यांच्या  हस्ते डॉ.श्यामा घोणसे,डॉ.अविनाश सांगोलकर,डॉ.मोहन लोंढे,डॉ. किरण भिंगारदेवे,राजेंद्र घावटे, रमेश हनुमंते, सुभाष खिलारे,  डॉ. कैलास दौंड, डॉ. दशरथ रसाळ, डॉ. शरद गायकवाड, पंढरी पगारे, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. कल्पना गोरले, डॉ. राजकुमार शेलार, रंगशाम मोडक,रश्मी गुजराथी, डॉ. मनीषा झोंबाडे, चुडाराम बल्लारपुरे, गोकुळ गायकवाड, सूर्यकांत तिवडे, युवराज नळे, नितीन शिंदे, अलका सपकाळ, बाबासाहेब ढोबळे, अंजली मराठे, विक्रांत केसरकर, तात्याराव पवार, श्रीनिवास मस्के, अरुण नवले, डॉ. अनंता सूर, प्रमोद नारायणे, पंढरी बनसोडे, नंदकुमार राऊत, समरसतेचे शिल्पकार डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. अश्विनी मडघे, तात्याराव चव्हाण, डॉ. प्रताप रनसिंग, डॉ. माई दोडके  विनायक लष्कर,मिलिंद मेढे इत्यादी 46 लेखकांच्या साहित्यकृतींना  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाङ्ग्मय पुरस्कार 2025 ने सन्मान करण्यात आले.    

    याप्रसंगी न्यायमूर्ती वेदपाठक म्हणाले “वास्तवाचे भान ,सामाजिक प्रश्नांची जाण आणि रंजकतेचे ध्यान ठेवून साहित्य निर्मिती करणाऱ्या महान लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने ज्या लेखकाच्या साहित्य कृतीला मिळालेला पुरस्कार हा त्या त्या विजेत्या लेखकांचा खरा सन्मान आहे.याशिवाय अशा थोर लेखकाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माझ्या हस्ते प्रदान केला जाणे हा माझ्यासाठी बहुसन्मान आहे.सामान्य वाचकाच्या मनात लेखनाची बीजे रुजवण्याची ताकद आण्णा भाऊ साठे यांच्या लेखनात होती. मनोरंजनसोबतच सामाजिक जाणिवा अचूक टिपण्याची अनोखी लेखनदृष्टि असणारे   अण्णा भाऊ साठे यांच्यासारखा  लेखक होणे नाही.”

       यावेळी मुकुंदराव कुलकर्णी आमदार अमित गोरखे, विलास लांडगे, डॉ. श्यामा घोणसे,अंजली मराठे,नंदकुमार राऊत यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ धनंजय भिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रोडे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रा.  सचिन पवार यांनी मांडले. कार्यक्रमप्रसंगी करण्यासाठी अनिल हातागळे,विशाल गवळी, निलेश लांडगे,माऊली निश्छल ,शरद शिंदे,रवि ननावरे,अनिल भस्मे,उज्ज्वला हातागळे,आबा देशपांडे,शंकर शेंडगे,सुरेश पाटोळे ,प्रसाद खंडागळे,डॉ.जयंत अवघडे, इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here