बुलडाणा,(प्रतिनिधी)- डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील साईराज व्हॅाली ईलीड व राज व्हॅाली हाउसिंग सोसायटी कांचनवाडी च्या वतीने डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पमाळा व मेनबत्ती आगरबतीने आदर्श शिक्षिका आस्मिताताई जाहागीरदार व पत्रकार विवेक जाहगीरदार यांनी पुजन केले. उपस्थीतांनी पुष्प वाहून अभिवादन केले व सामुदायिक बुध्द वंदना घेण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहूणे आस्मिताताई जाहीगीरदार उपस्थीतांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ज्या ज्या समाजाने, समुहाने आत्मसात केले त्या समाजाची व समुहाची प्रगती झाली आहे सर्वांची प्रगती झाली म्हणजे आपोआपच देशाची प्रगती होतो तर प्रत्येक व्यक्तीने डॅा. बाबासाहेब आंहेडकरांचे विचार आत्मसात करावे आज जी मी तूमच्या पुढे बोलत आहे व उच्च विभूषित झाले हे सर्व डॅा. बाबासाहेबांचे उपकार आहे. या भारत देशात स्रीयांना समानतेचा, स्री स्वातंत्र्याचा जो अधिकार दिला तो डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले या देशात सर्वात जास्त उपकार स्रीयांवर केले ते स्रीयांनी विसरूनये असे विचार यावेळी मांडले.
छत्रपती संभाजीनगरचे कोषागार अधिकारी संजयजी धिवर यावेळी बोलतांना म्हणाले की, आज जे आपण चांगल्या घरात, चांगल्या समुहात, चांगले कपडे , सकस आहार जो खात आहे हे सर्व डॅा. बाबासाहेब आंबेंडकरांन मुळे आपणा चागले जगण्याचा स्वतंत्र अधिकार मिळाला.
यावेळी संभाजीनगर पोलीस अयुक्त कार्यालयाचे एपीआय अनिल कंकाळ, एमएसईबीचे अधिक्षक सुनिल सातदिवे, आरोग्यधिकारी आशाताई अनिल भोगे, कृषी प्रवेशक आशीष देवताळू, आदर्श शिक्षक प्रतीक भोगे, नरसिहदास जैन, बॅंक मॅनेजर अंकीत भोगे, संध्याताई सातदिवे, अनिल शिंदे, पुजा शिंदे, प्रणाली देवताळू इत्यादी बहुसंख्येने साईराज व राज व्हॅाली मधील उपासक उपासिका हाजर होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्तावीक रिपाई संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव तर आभार शिक्षण विस्तारधिकारी विमल जाधव यांनी केले.