Dettol reacted after Podcaster Questioned Its Antiseptic Liquid

0

[ad_1]

भारतातील सर्वात लोकप्रिय स्वच्छता ब्रँडमध्ये डेटॉलची गणना केली जाते. दरम्यान एका पॉडकास्टमध्ये डेटॉलसंदर्भात काही धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. या पॉडकास्टमध्ये अँटीसेप्टिक द्रव (ASL) डेटॉल थेट जखमांवर लावणं हानीकारक असू शकतं असा दावा करण्यात आला आहे. मात्र कंपनीने हे दावे फेटाळून लावले आहेत. डॉ. मनजोत मारवाह यांनी कंटेंट क्रिएटर राज शमानी याच्यासोबतच्या पॉडकास्ट दरम्यान हा दावा केल्यानंतर ब्रँडने म्हटलं आहे की, स्वयंघोषित त्वचारोगतज्ज्ञांचे असे दावे पूर्णपणे चुकीचे, निराधार, खोडसाळ आणि अवैज्ञानिक आहेत.

“हे पॉडकास्ट घराघरात प्रसिद्ध असलेल्या डेटॉल नावाची प्रतिष्ठा कलंकित करण्याच्या स्पष्ट हेतूने प्रसारित केलं असल्याचं दिसत आहे. संबंधित व्यक्ती मनोरंजक आणि अतिशय खोडकरपणे डेटॉल एएसएलच्या गुणधर्मांचं चुकीचे वर्णन करतं आहे, जे एक औषध आहे, परंतु ती डेटॉल साबणासह कॉस्मेटिक उत्पादन असलेल्या डेटॉल श्रेणीच्या उत्पादनांबद्दल ग्राहकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून एएसएलचा उल्लेख करत नाही,” असं डेटॉलने एका निवेदनात म्हटलं आहे.

डेटॉलच्या उत्पादनांची निर्मिती करणारी मूळ कंपनी रेकिट बेंकीसर इंडियाने ही बदनाम करण्यासाठी चालवण्यात आलेली मोहीम असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण आमच्या उत्पादनांना लक्ष्य करणाऱ्या महिलेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती दिली आहे.

डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विडला सरकारी अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) मान्यता दिली आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

डेटॉल एएसएल हे एक प्रतिष्ठित आणि सुप्रसिद्ध अँटीसेप्टिक आहे असं सांगताना कंपनीने म्हटलं आहे की, हे उत्पादन 90 वर्षांपासून जागतिक स्तरावर प्रथमोपचार, जखमा स्वच्छ करणे आणि इतर वापरासाठी विकले जात आहे. सर्व डेटॉल उत्पादने त्वचेसाठी कठोर सुरक्षा मानके पूर्ण करतात, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

“आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना तथाकथित त्वचारोगतज्ज्ञांच्या अशा प्रेरित आणि अजेंडा चालवमाऱ्या मतांकडे लक्ष देऊ नये अशी सूचना देतो. कंपनी या दाव्यांवर योग्य कारवाई सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे,” असं डेटॉलने म्हटलं आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here