[ad_1]
महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता मी बोलायचे नाही ठरवले आहे. पण, कार्यक्रम करायचे ठरवले आहे, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. बिदाल येथे नागरी सत्कार कार्यक्रमात जयकुमार गोरे उपस्थित होते. याव
.
यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, आता मी बोलायचे नाही ठरवले आहे. पण, कार्यक्रम करायचे ठरवले आहे. अनेक जण मला आता सांगत आहेत की, माझा संबंध नाही. पण कोणी काय-काय केले आहे, त्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. माझ्या विरोधात अनेक षड्यंत्र झाले. ते सगळे सहन केले. पण, शेवटचे षड्यंत्र माझ्या विरोधात झाले, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे कोणाचा कार्यक्रम कधी लागतोय एवढाच विषय आहे. अनेकजण देवेंद्र फडणवीस यांच्या जाऊन पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले. त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे की, षड्यंत्र करणारा कधीही जिंकलेला नाही.
पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, आता माझ्यासमोर एकच उद्दिष्ट आहे. मला परमेश्वराने नवीन जीवन दिले. इतका मोठा अपघात झाला. त्यातून पुन्हा उभा राहिलो. तेव्हाही काही जण म्हणत होते की, हा आता नीट चालेल का नाही? नीट बोलेल का नाही? आता पहिल्यासारखे काम जमेल का नाही? त्यातूनही देवाने मला पुन्हा उभे केले. आज ताकदीने मी तुमच्या सर्वांसमोर उभा आहे. इतक्या संकटातून जयकुमार येतो तेव्हा देवाने देखील माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत. देवाला पण माझ्याकडून काही करून घ्यायचे आहे. ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे. कोणी कितीही देव पाण्यात घालू द्या, जे उद्दिष्ट मला परमेश्वराने, माझ्या पक्षाने, माझे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही.
दरम्यान, जयकुमार गोरे यांनी त्यांच्या भाषणात नेमका कोणाला इशारा दिला आहे हे अद्याप समजू शकले नाही. सध्या महाराष्ट्रात राजकारण देखील बदलताना दिसत आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने देखील जोर धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
[ad_2]