Rs 2 lakh stolen by breaking into donation box in Hanuman temple, incident in Khatkal, Hingoli captured on CCTV | हनुमान मंदिरात दानपेटी फोडून 2 लाखांची रक्कम पळविली: हिंगोलीच्या खटकाळीमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद – Hingoli News

0

[ad_1]

हिंगोली शहरालगत खटकाळी हनुमान मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अवघ्या वीस मिनिटात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक रक्कम पळविली आहे. यावेळी तेथील रखवालदारास चोरट्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली तर सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला करून त्यांनी ह

.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहराचे ग्रामदैवत म्हणून ओखळल्या जाणाऱ्या खटकाळी हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी असते. रविवारी ता. 20 मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे मंदिराच्या परिसरात आले. त्यांनी त्या ठिकाणी असलेले रखवालदार बबनराव यांना धमकावले. तु चुपचाप झोपून रहा, उठला तर पिस्टलने उडवून देईन अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या अंगावर पांघरून टाकून दिले.

त्यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या परिसरातच लावलेला ध्वज काढून तोंडाला बांधला व मंदिराच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला वळविले. चोरट्यांनी त्या ठिकाणी राहात असलेल्या भगवानदास महाराज यांच्या खोलीच्या बाहेरून कड्या लाऊन घेतल्या. त्यानंतर मुख्य चॅनलगेट वाकवून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील दरवाजा तोडून मुख्य मंदिरात प्रवेश करून त्या ठिकाणी असलेली दानपेटी बाहेरील हॉल मध्ये आणली व त्या ठिकाणी पेटी फोडून त्यातील रक्कम पळविली.

दरम्यान, सकाळी पाच वाजता जागे झालेल्या बबनराव यांनी भगवानदास महाराज यांच्या दरवाजाच्या कड्या उघडून त्यांना त्यांना घडलेली घटना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच आरती ग्रुपचे सर्व सदस्य घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच हनुमान जन्मोत्सव व भंडाऱ्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी झाला. हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी सुमारे वीस हजारपेक्षा अधिक भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे दानपेटीत सुमारे 2 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा झाली होती असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मंदिर प्रशासनाने मागील तीन ते चार महिन्यापासून दानपेटीतील रक्कमही काढली नसल्याचे सांगण्यात आले. चोरट्यांनी अवघ्या वीस मिनिटात दानपेटी फोडून पलायन केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here