डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकारले पाहिजेत:शिक्षणानेच समाजात परिवर्तन, पुण्याच्या सहायक आयुक्त वंदना साळवे यांचे ढोकबाभूळगावमध्ये प्रतिपादन

0

[ad_1]


कुरूल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला घटना दिली. त्या घटनेवर देशाचा कारभार सुरळीत चालू आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. महिलांना चूल आणि मूल या जोखडातून बाहेर काढत समतेची वागणूक मिळावी, अशी व्यवस्था केली. ज्या महिलांनी महापुरुषांचे विचार अंगीकारले त्या राष्ट्रपती झाल्या अन् ज्या महिलांनी मनुस्मृतीचे विचार अंगीकारले त्या सती गेल्या, असे प्रतिपादन पुणे महापालिकेच्या सहायक आयुक्त वंदना संभाजी साळवे यांनी केले. त्या ढोकबाभूळगाव (ता. मोहोळ) येथे डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी केले. या वेळी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन सहायक आयुक्त वंदना साळवे, संभाजी साळवे, राजाराम पांढरे, उपसरपंच सचिन साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संतोष साळवे, लक्ष्मण साळवे, पोलिस पाटील आदीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिर आणि विविध योजनांचे दाखले ५० टक्के सवलतीत काढून देण्यासाठी शिबिर घेण्यात आले. भीमज्योत कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श सरपंच विविध दाखल्यांच्या शिबिराला प्रतिसाद यावेळी फार्मर आयडी, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नावामध्ये बदल अशा विविध दाखले काढण्यासाठी शिबिर आयोजित केले होते. भारतीय बौद्ध महासभेचे हृषीकेश सुतकर, डॉ. दयानंद सोनवले, हरी सरवदे यांनी परिश्रम घेतले. गरजू ५० जणांची नेत्र तपासणी मोफत चष्मा दिला जाणार जयंतीनिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरात ५० जणांची नेद्ध तपासणी करण्यात आली. या वेळी डॉ. मंजिरी पाटील यांनी नेत्र तपासणी केली. गरजूंना सवलतीमध्ये चष्मा देण्यात येणार आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. आदर्श सरपंच शिवाजी पासले म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज निर्माण करण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत. माजी सरपंच बंडू मुळे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी फक्त एका समाजासाठी नाही तर संपूर्ण देशवासीयांसाठी घटनेच्या रूपात अधिकार दिले. तयामुळे सामान्य माणूस सन्मानाने जगू लागला. या वेळी काँग्रेसचे मोहोळ शहराध्यक्ष किशोर पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती केली. त्यांच्या विचारावर चालणारी सामाजिक चळवळ पुढे गेली पाहिजे. त्या चळवळीतून समाज परिवर्तन घडण्यास मदत होईल. यावेळी ढोकबाभूळगावमधील उपासक, उपासिका, बालचमू उपस्थित होता. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रवीण साळवे यांनी प्रास्ताविक केले. अण्णा साळवे यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष शशिकांत आठवले यांनी आभार मानले. माजी सरपंच भुजंग साळवे यांनी भोजन दिले. भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा केला गौरव डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिका सहायक आयुक्त वंदना साळवे, वकिलीची सनद मिळाल्याबद्दल आमसिद्ध साळवे यांचा सन्मान करण्यात आला. ढोकबाभूळगावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सचिन साळवे यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय साळवे यांचाही सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर. शिबिरात २५ जणांचे रक्तदान, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग जयंतीनिमित्त यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. बसवेश्वर ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here