[ad_1]
सांगली जिल्ह्यात राजकीय समीकरण बदलताना दिसून येत आहे. शरद पवार गटाचे 2 माजी आमदार, भाजपचे माजी आमदार, आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह आणखी एका माजी आमदाराने अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडणार
.
दरम्यान राष्ट्रवादी पक्षफुटीच्या वेळी सांगलीमधून अजित पवार यांच्यासोबत कोणताही मोठा नेता गेला नाही. माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि राजेंद्र देशमुख माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील हे मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
हे 4 माजी आमदार अजित पवारांच्या पक्षात
सांगलीमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि राजेंद्र देशमुख हे शरद पवारांची साथ सोडणार आहे. तर माजी आमदार विलासराव जगताप यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकला आहे, अजितराव घोरपडे कोणत्याच पक्षात सक्रीय नसले तरी या चौघांनी आता अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानात दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. शशिकांत पाटील यांच्या पुढाकारने हे सर्व प्रवेश पार पडणार आहेत.
मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. काही महिन्यानंतर महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला ताकद मिळाली. आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे. या जाहीर प्रवेशामुळे सांगलीतील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
[ad_2]