[ad_1]
मुंबईतील विलेपार्ले येथे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जैन मंदिर पाडण्यात आल्याचा प्रकार घडला. याविराेधात मुंबईत माेठया प्रमाणात निर्देशने हाेत असतानाच आता पुण्यातील जैन समाजाने देखील मंगळवारी सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढून घटनेचा न
.
प्रवीण चाेरबले म्हणाले, 16 एप्रिल राेजी विलेपार्ले येथे जी जुने जैन मंदिर पाडण्याची घटना मनपाकडून घडली त्याचा निषेध आम्ही व्यक्त करताे. 90 वर्षाची परंपरा असलेले हे मंदिर एका रात्रीत जमीनदाेस्त करण्यात आले. तेथील हाॅटेल चालक किंवा मनपा अधिकारी यांनी हे कृत्य केले. न्यायालयात याबाबत दावा सुरु असताना, न्यायालयास ही विश्वासत न घेता संबंधित कारवाई करण्यात आली. मनपा मध्ये राज्यात काेणत्याही लाेकप्रतिनिधीची सत्ता नसून मनपा आयुक्त व इतर अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरु आहे. काेणता निर्णय घेण्यासाठी नगरसेवक निर्णय घेतात व ठराव करतात त्यानंतर त्याची अंमलबजावणी मनपाकडून केली जाते. परंतु आयुक्त यांनी व संबंधित अधिकारी यांनी काेणाला विश्वासात न घेता कारवाई केली. ग्रंथ मंदिरातील विखुरले गेले व रस्त्यावर टाकले गेले.

आज चार संप्रदायचे जैन समाजातील लाेक रस्त्यावर उतरल असून समाज बांधव यांच्यात तीव्र भावना आहे. या गाेष्टी थांबल्या नाहीतर आगामी काळात अधिक तीव्र आंदाेलन करण्यात येणार आहे. साधूसंत यांच्यावर हाेणारे हल्ले देखील चुकीचे आहे.जैन संत पायी जाताना त्यांना मारहाण हाेतेे, गाडीने उडवले जातात. त्यांना काेणती अपेक्षा नसताना ते समाजाला केवळ प्रबाेधन करण्याचे व जाेडण्याचे काम करतात. भगवान महावीर यांचा संदेश आहे जगा आणि जगू द्या. जैन समाज अल्पसंख्याक असून वेगळया नजरेने आमच्याकडे पाहिले जाते.
[ad_2]